Wed, Jul 17, 2019 18:34होमपेज › Satara › पाचवडमध्ये दोघांनी एकमेकांवर रोखले पिस्तूल 

पाचवडमध्ये दोघांनी एकमेकांवर रोखले पिस्तूल 

Published On: Jan 16 2018 2:17AM | Last Updated: Jan 15 2018 10:36PM

बुकमार्क करा
भुईंज : वार्ताहर

पाचवड, ता. वाई येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोघांमध्ये एकमेकांवर पिस्तूल रोखत शिवीगाळ करत मारामारी झाल्याची परस्पर विरोधी तक्रार भुईंज पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. 

याबाबत भुईंज पोलिस स्टेशनचे सपोनि बाळासाहेब भरणे यांनी दिलेली माहिती अशी,  दि. 14 जानेवारी 2018 रोजी संक्रांतीदिवशी पाचवड येथील बाजार तळावर असलेल्या शॉपिंग सेंटरसमोर नीलेश मुकुंद गायकवाड व सरताळे, ता. जावली येथील युनुस जमाल शेख यांच्या जुन्या भांडणाच्या कारणावरून एकमेकांना शिवीगाळ करत मारामारी झाली. त्यानंतर दोघांनीही परस्पर विरोधी तक्रारी दाखल करताना एकमेकांना संपवण्यासाठी पिस्तूल रोखल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर भुईंज पोलिस ठाण्यात दोघांवरही गुन्हा दाखल झाला.