Wed, Jul 17, 2019 20:01होमपेज › Satara › ओगलेवाडी पोस्ट कार्यालय फोडले

ओगलेवाडी पोस्ट कार्यालय फोडले

Published On: Dec 03 2017 1:03AM | Last Updated: Dec 02 2017 10:48PM

बुकमार्क करा

कोपर्डे हवेली : वार्ताहर

ओगलेवाडी (ता. कराड) येथील पोस्ट कार्यालय चोरट्यांनी फोडले. दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे 56 हजार रूपयांचे संगणकाचे साहित्य चोरून नेले. शुक्रवारी (दि. 1) रात्री ही घटना घडली. याबाबतची फिर्याद डाक सहाय्यक सौ. लक्ष्मी देशपांडे यांनी पोलिसात दिली असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की,  सौ. लक्ष्मी देशपांडे या गेल्या  तीन महिन्यांपासून ओगलेवाडी पोस्ट कार्यालयात डाक सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याबरोबर निलेश भोसीकर व आत्माराम घुटे हे दोघे या कार्यालयात नोकरीस आहेत. दरम्यान, येथील पोस्ट कार्यालय नवीन इमारतीमध्ये शिफ्ट केले असल्याने शुक्रवारी (दि. 1) सुट्टी असूनही ते सर्वजण कार्यालयात आले होते. सायंकाळी 5 वाजता दरवाजाला कुलूप लावून कार्यालय बंद केले. शनिवारी सकाळी ते नवीन कार्यालयात आले असता त्यांना जुने पोस्ट कार्यालय फोडल्याची  माहिती  मिळाली. त्यानुसार  त्यांनी जुन्या पोस्ट कार्यालयात जाऊन पाहिले असता दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. 

कुलूप तोडून चोरट्यांनी कोपर्‍यात टाकले होते. तर कार्यालयातील नेहमीच्या वापरातील तीन मॉनिटर, दोन सीपीयु, एक नवीन मॉनिटर व सीपीयु सेट, तीन किबोर्ड, तीन माऊस असे सुमारे 56 हजार रुपये किमतीचे संगणकाचे साहित्य चोरून नेले आहे. अधिक तपास विष्णू गरडे करत आहेत.