Mon, Sep 24, 2018 15:18होमपेज › Satara › शहीद जवानाची जमीन हडप करणाऱ्यावर गुन्हा

शहीद जवानाची जमीन हडप करणाऱ्यावर गुन्हा

Published On: Feb 15 2018 8:40PM | Last Updated: Feb 15 2018 8:17PMवडूज : वार्ताहर

शहीद जवान रामचंद्र गोपाळ धुरगुडे यांच्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी शासनाकडून मिळालेली जमीन हडपल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंबंधी संशयित दिगंबर श्रीरंग शिंगाडे याच्यावर वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शहीद जवान रामचंद्र धुरगुडे यांच्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी शासनाकडून पाच एकर जमीन मिळाली होती. दिगंबर शिंगाडे याने खोटा मृत्यूचा दाखला, खोटे प्रतिज्ञापत्र, प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक केली. तर वीर माता हौसाबाई धुरगुडे यांचा एकमेव वारस असल्याची बोगस नोंद करून पाच एकर जमीन हडप केली होती. या प्रकरणी शिंगाडे याच्यावर वडूज पोलिसांत गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. वडूज पोलिस यासंबंधी अधिक तपास करत आहेत.