Mon, Jun 17, 2019 02:17होमपेज › Satara › जिल्ह्यातील ७० हजार खातेदारांना पाणीपट्टी वसूलीच्या नोटिसा 

जिल्ह्यातील ७० हजार खातेदारांना पाणीपट्टी वसूलीच्या नोटिसा 

Published On: Dec 09 2017 1:46AM | Last Updated: Dec 08 2017 10:27PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा न्यायालयात शनिवारी होणार्‍या राष्ट्रीय लोक अदालतीच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यातील 1 हजार 496 ग्रामपंचायतींपैकी 743 ग्रामपंचायतींमधील 69 हजार 977 खातेदारांना ग्रामपंचायत कर व पाणी पट्टीवसूलीसाठी नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. 

सातारा तालुक्यातील 83 ग्रामपंचायतींमधील 9 हजार 286 खातेदारांकडे 3 कोटी 28 लाख 47 हजार रूपये, कोरेगाव तालुक्यातील 82 ग्रामपंचायतींमधील 10 हजार 159 खातेदारांकडे 1कोटी 14 लाख 782 रूपये, खटाव तालुक्यातील 81 ग्रामपंचायतींमधील 6 हजार 564 खातेदारांकडे 1 कोटी 84 लाख 76 हजार रूपये, माण तालुक्यातील 90 ग्रामपंचायतींमधील 6 हजार 858 खातेदारांकडे 1 कोटी 32 लाख 54 हजार रूपये, फलटण तालुक्यातील 91 ग्रामपंचायतींमधील 11 हजार 518 खातेदारांकडे 2 कोटी 36 लाख 34 हजार रूपये, खंडाळा तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींमधील 3 हजार 594 खातेदारांकडे 2 कोटी 20 लाख 21 हजार रूपये,

वाई तालुक्यातील 46 ग्रामपंचायतींमधील 4 हजार 730 खातेदारांकडे 1 कोटी 6 लाख 65 हजार रूपये, जावली तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींमधील 637 खातेदारांकडे  12 लाख 73 हजार रूपये,महाबळेश्‍वर तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींमधील 120 खातेदारांकडे 29 लाख 63 हजार रूपये, कराड तालुक्यातील142 ग्रामपंचायतींमधील 14 हजार 521 खातेदारांकडे 6 कोटी 84 लाख 21 हजार रूपये, पाटण तालुक्यातील 43 ग्रामपंचायतींमधील 1 हजार 190 खातेदारांकडे 70 लाख 63 हजार रूपये असे मिळून 21 कोटी 20 लाख 22 हजार 658 रूपयांची थकबाकी आहे. ही सर्व प्रकरणे शनिवारी होणार्‍या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली निघण्याची शक्यता आहे.