Wed, Apr 24, 2019 07:36होमपेज › Satara › शेतकर्‍यांनी पैसे भरूनही पाणी बंद

शेतकर्‍यांनी पैसे भरूनही पाणी बंद

Published On: May 25 2018 1:12AM | Last Updated: May 24 2018 7:49PMउंडाळे : प्रतिनिधी 

कराड दक्षिण विभागातील येळगाव येणपे आटेकरवाडी या धरणातील शिल्लक पाणी टंचाईग्रस्त विभागाला शेेतकर्‍यांनी मागणी केल्यानंतर पैसे भरून सोडण्यात आले. मात्र, येणपे ग्रामस्थांनी नदीत सोडलेले पाणी बंद केले. यामुळे येणपे येथील ग्रामस्थ व पाण्याचा लाभ घेणार्‍या लाभार्थी शेतकर्‍यामध्ये चांगली वादावादी झाली व धरणातील सोडलेले पाणी बंद केले. दरम्यान, पैसे भरूनही पाणी न मिळाल्याने संतप्त शेेतकर्‍यांनी जलसंधारण विभागाकडे आपले गर्‍हाणे तीव्र शब्दांत मांडले. 

मार्च महिन्यापासून दक्षिण विभागात मोठया प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वाकुर्डे योजनेचे पाणी 32 लाख रूपये थकीत असल्याने प्रशासनाने हे पाणी सोडण्यास वीजबिल भरल्याशिवाय असमर्थता दर्शवली. त्यामुळे ओंड, उंडाळे, नांदगाव, मनु येथील शेतकर्‍यांसाठी येणपे आटेकेरवाडी येळगाव या धरणात असलेला शिल्लक पाणी साठा सोडण्याची तयारी संबंधित विभागाने दर्शविली. त्यासाठी 9 लाख 42 रूपये पाणी पट्टी भरावी, असे सांगितले. तेव्हा श्रमिक मुक्‍तीदलाच्या वतीने हे पैसे भरून पाणी सोडण्यात आले. पण येणपे ग्रामस्थांनी हे पाणी  सोडण्यास विरोध करून सोडलेले पाणी अनेकदा बंद केले व यावरून या विभागातील शेेतकर्‍यांची व येणपेकरांची  चांगलीच जुंपली, वादावादी, शिवीगाळ यानंतर पोलिसांची कुमक यासह गोष्टी घडल्या.

हे पाणी वादावादीत अडकले. मात्र, येळगाव व आटेकरवाडी धरणांतून पाण्याचा विसर्ग राहिला. त्यामुळे उंडाळेपर्यंत पाणी पोहचले. मात्र, येणपेकरांनी जाणीवपूर्वक धरणात शिल्लक पाणी असताना आडमुठी भूमिका घेतल्याने या विभागातील शेेतकरीही संतप्त झाला आहे. दरम्यान, येणपे तलावातील पाणी हे येणपेकरांसाठी आहे. असे असताना पाटबंधारे विभागाने यात लक्ष घालून व पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन शेतकर्‍यांना दिले. पण पाटबंधारे विभागाचे कचखाऊ धोरण हे पाणी सोडण्यासाठी अडथळा असून पाणी अडवणार्‍यांना शासकीय नियम दाखवून कारवाईचा बडगा उचलला असता तर हे धाडस ‘त्या’ शेतकर्‍यांनी केलेे नसते, असे मत शेेतकरी व्यक्‍त करीत आहेत. पावसाळा तोंडावर येण्यास आठवडा राहिला तरी प्रशासनेच्या धिम्या कामकाज पद्धतीने पाणी मिळण्यास विलंब होत असल्याबद्दल शेेतकर्‍यांमधून नाराजी व्यक्‍त होत आहे.