Sun, May 19, 2019 22:25होमपेज › Satara › नीरा -भीमा स्थिरीकरणाचे काम स्वाभिमानीने पाडले बंद

नीरा -भीमा स्थिरीकरणाचे काम स्वाभिमानीने पाडले बंद

Published On: Dec 05 2017 2:00PM | Last Updated: Dec 05 2017 2:00PM

बुकमार्क करा

फलटण : प्रतिनिधी 

सोमंथळी ता.फलटण येथील नीरा भीमा स्थिरीकरणाचे काम स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बंद पाडले. जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नसल्याने स्थानिक शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हे काम बंद पाडले.  

याबाबत मार्च २०१८ मध्ये हे काम पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या होत्या. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद अंतर्गत येणाऱ्या कृष्णा मराठवाडा बांधकाम विभाग, उस्मानाबाद यांनी शेतकऱ्यांच्या जमीनी घेतल्या आहेत. त्याचा योग्य मोबदला दिला जात नाही. तसेच ती सर्व क्षेत्रे बागायती असताना त्यांना संबंधित विभाग यांनी जिरायती दाखवल्या आहेत. यामुळे मोबदला म्हणून रक्कम ही कमी मिळत आहे.

एकरी ४० लाख रुपयांची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ही रक्कम मिळेपर्यंत काम सुरू करून देणार नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले असल्याने हे आंदोलन पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.