Wed, Jul 17, 2019 20:01होमपेज › Satara › पंढरपूरला दर्शनासाठी आता नवी कार्यप्रणाली : डॉ. अतुल भोसले

पंढरपूरला दर्शनासाठी आता नवी कार्यप्रणाली : डॉ. अतुल भोसले

Published On: Jan 18 2018 1:45AM | Last Updated: Jan 17 2018 10:40PM

बुकमार्क करा
उंडाळे : प्रतिनिधी 

पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांना दर्शन रांगेत उभे रहावे लागणार नाही. त्यासाठी तेथे नवी कार्यप्रणाली राबविण्यात येत असून भक्तांना सुलभ दर्शन होईल, असे प्रतिपादन विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष  व  भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी  केले.

सवादे ता. कराड येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरच्या अध्यक्षपदी डॉ. अतुल भोसले यांची  निवड झाल्यानंतर आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्ष स्थानी कराडच्या मठाचे मठाधिपती बाजीराव मामा कराडकर होते.  प्रमुख उपस्थिती य.मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, संचालक  धोंडिराम जाधव,  जितेंद्र उर्फ बाळासाहेब पाटील,  सवादेचे उपसरपंच संजय शेवाळे, सरपंच लिलावती कांबळे, शिवाजी थोरात, हणमंतराव  थोरात यांची होती.

डॉ. अतुल भोसले म्हणाले, आजचा कार्यक्रम राजकीय धार्मिकतेची सांगड घालणारा आहे. आज केंद्रात व राज्यात भाजपा सत्तेवर असल्याने या सरकारच्या माध्यमातून विकास कामे केली जातील.  कराड दक्षिणसाठी एक कोटी रुपयांची कामे आणली आहेत. पंढरपूर मंदिर समिती स्थापनेपासून प्रथमच अध्यक्षपद सातारा जिल्ह्याला मिळाले आहे हा जिल्ह्याचा सन्मान आहे. अध्यक्ष झाल्यापासून अनेक धाडसी निर्णय घेऊन सुधारणा केल्या. त्याचे सकारात्मक बदल आता दिसू लागले आहेत. यावेळी पेंटर माहिंदकर यांनी या विभागातील प्रश्‍न मांडले.डॉ. सुरेश भोसले  यांनी कराड दक्षिण विभागात प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच वाकुर्डेचे पाणी विभागाला दिले जाईल असे आश्‍वासन  दिले.