Tue, Mar 26, 2019 20:12होमपेज › Satara › माणची माती कर्तृत्ववान : शरद पवार

माणची माती कर्तृत्ववान : शरद पवार

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 23 2018 10:21PMदहिवडी : प्रतिनिधी 

कर्तृत्ववान माणसे घडवण्याची ताकद माणच्या मातीत आहे. कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करत पुढे जाणारी मंडळी खरोखरच राज्याला दिशा देणारी असल्याचे चित्र पहायला मिळत आहे, असे प्रतिपादन खा. शरद पवार यांनी केले.

महिमानगड येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या नूतन इमरतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रयतचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, डॉ. भाऊसाहेब कराळे, प्रा. संजीव पाटील, डॉ. विजयसिह सावंत, रयत शिक्षण संस्थेचे संचालक प्रभाकर देशमुख, वाघोजीराव पोळ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सभापती रमेश पाटोळे, सुभाष घाडगे महाराज व मान्यवर उपस्थित होते.     

पवार म्हणाले, 50 वर्षांपूर्वी स्व. यशवंतराव चव्हाण यांनी या शाळेचे उद्घाटन केले. येथून अनेक पिढ्या उभ्या राहिल्या. कर्मवीर अण्णांनी पुढाकार घेतला. त्यांना रयतेचा पाठिंबा मिळाल्यानेच आज संस्थेत 4 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 

शिक्षित लोक नुसते शिक्षित होऊन चालणार नाही तर त्यांना संगणक शिक्षित करण्याचे काम या रयत संकुलात होत आहे. आज पुण्या- मुंबईत असताना प्रशासनात अनेक अधिकारी माणमधले असल्याचे मला पहायला मिळत आहेत. माझी पुस्तकाने तुला केली ही चांगल्या प्रकारची पुस्तके  ग्रंथालयात ठेवून अनेक विद्यार्थी घडवा, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

डॉ. पाटील म्हणाले, महिमानगडची शाळा ही एकेकाळी गाजलेली शाळा होती. आज या शाळेला 6 स्मार्ट बोर्ड, 25 संगणक संच दिले असून शेजारीच दहिवडी या ठिकाणी क्रीडा संकुल उभे केलेे असून या ठिकाणी देशपातळीवरील कोच व शाळा देशात सर्वोत्कृष्ट असेल. 

महिमानगड येथील शाळेत शिकलेल्या माजी विध्यार्थी संघाने मोठी भरीव मदत केली आहे. यावेळी प्रभाकर देशमुख यांनी मनोगत व्यक्‍त केले. मुख्याध्यापक ए. एस. गायकवाड यांनी प्रास्तविक केले.

माणदेश फौंडेशनने दिला पन्नास हजाराचा धनादेश

माण तालुक्यातील तरुणांनी पुणे येथे माणदेश फौंडेशन  सामाजिक संस्था स्थापन करून त्या माध्यमातून माण तालुक्यात सामाजिक कामे सुरू केली. याही कार्यक्रमामध्ये माणदेश फौंडेशनच्यावतीने 50 हजाराचा धनादेश अध्यक्ष  अशोक माने व  त्यांच्या सहकार्‍यांनी शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केला.त्यांच्या समाज कार्याचा गौरव शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

 

Tags : satara, Mahimangad news, New English School, New building Bhumipujan,