Sun, Feb 23, 2020 04:02होमपेज › Satara › पूरग्रस्त महिला व मुलांसाठी उबदार कपड्यांची गरज : आ. शंभूराज देसाई

पूरग्रस्त महिला व मुलांसाठी उबदार कपड्यांची गरज : आ. शंभूराज देसाई

Published On: Aug 18 2019 11:41AM | Last Updated: Aug 18 2019 12:46PM
कराड : प्रतिनिधी

पाटण तालुक्यात पूर परिस्थितीमुळे अनेक गावे ,वाड्या वस्त्या यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेकडो कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. बाधित कुटुंबांसाठी धान्य ,कपडे जमा होत आहेत, पण महिला व लहान मुलांसाठी स्वेटरची गरज आहे. धान्य, अर्थिक साहाय्य यासोबत उबदार कपड्यांचीही मदत करा असे आवाहन आमदार शंभूराज देसाई यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत केले .

बाळासाहेब देसाई कारखान्यावर पूरग्रस्तांसाठी मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. लोकांनी दिलेली मदत योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचेल त्याची खबरदारी घेण्यात आली आहे. पूरग्रस्तांसाठी धान्य व कपडे जामा होत आहेत. मी जेव्हा बाधित झालेल्या घरांची व कुटुंबांची भेट घेऊन पाहणी केली तेव्हा या कुटुंबातील महिला व लहान मुलांना उबदार कपड्यांची गरज असल्याचे दिसून आले. त्यामुळे दानशूर व्यक्ती व नागरिकांनी स्वेटर व उदार कपडे देसाई कारखान्यावरील मदत केंद्रात जमा करावेत असे आवाहन आमदार देसाई यांनी केले आहे. 

दरम्यान, तांबवे जुना पूल पडला असून नवीन पुलाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे पुलापलीकडे गावांची रहदारीची मोठी गैरसोय होत आहे. नवीन पुलाचे काम तत्काळ पूर्ण करावे यासाठी बांधकाम विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. सोमवारपर्यंत हा पूल दुचाकी-चारचाकी वाहनांसाठी खुला होईल असेही आमदार देसाई यांनी सांगितले.