Wed, Nov 21, 2018 15:26होमपेज › Satara › देशी पिस्तूल बाळगणार्‍यास अटक

देशी पिस्तूल बाळगणार्‍यास अटक

Published On: Apr 06 2018 1:29AM | Last Updated: Apr 05 2018 10:54PMलोणंद : वार्ताहर

वाठार बुद्रुक, ता. खंडाळा गावच्या हद्दीत अवैधरीत्या देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणार्‍या युवकाला पोलिसांनी अटक केली असून पिस्तूल हस्तगत केले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

याबाबत लोणंद पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवारी 5 वाजण्याच्या सुमारास वाठार बु. (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत शुभम जोतिबा लाड हा बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्तूल बाळगून वावरत होता. याची खबर लोणंद पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांना मिळताच त्यांनी उपनिरीक्षक गणेश पवार व श्रीनाथ कदम, रोहित गायकवाड, ज्ञानदेव साबळे, लक्ष्मण डोंबाळे, फैय्याज शेख, संजय देशमुख शिंदे आदी सहकार्‍यांसह शुभम लाड यास वीर धरणाजवळ गाठले.

धरणाच्या उजव्या कॅनॉलच्या पुलावर पाठलाग करून  त्यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल सापडले. या पिस्तूलमध्ये काडतुसे सापडली नाहीत. या घटनेची नोंद लोणंद पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली असून अधिक तपास सपोनि सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश पवार हे करत आहेत.

 

Tags : satara, Lonand, Lonand news, Pistol, Pistol holder, arrested