Thu, Nov 15, 2018 17:00होमपेज › Satara › महामार्गावर भरत गावजवळ ट्रक पेटला

महामार्गावर भरत गावजवळ ट्रक पेटला

Published On: Feb 11 2018 12:57AM | Last Updated: Feb 10 2018 10:44PMनागठाणे : वार्ताहर

भुसा घेवून कोल्हापूरच्या दिशेने निघालेला मालट्रक शनिवारी सकाळी  6 च्यासुमारास महामार्गावरील नागठाणे हद्दीत अचानक पेटला. बघता बघता  काही क्षणातच ट्रक पूर्णत: जळून खाक झाल्यामुळे केवळ सांगाडाच उरला. मालट्रक नागठाणे जवळील भरतगावजवळ हेरंब मंगल कार्यालयाजवळ येताच वरील भागातून धूर निघू लागला. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने ट्रक रस्त्याकडेला घेतला. ट्रकमध्ये लाकडाचा भुसा असल्यामुळे पेट घेतला. काही क्षणातच संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आगीमुळे ट्रकचे सर्व टायरही मोठा आवाज करत फुटले.

त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेदरम्यान अजिंक्यतारा कारखाना आणि सातारा पालिकेचे अग्निशमन बंब दाखल झाले होते. मात्र, आग आटोक्यात येवू शकली नाही.  या आगीत ट्रकचा केवळ सांगाडाच  उरला. या घटनेमुळे बघ्यांची गर्दी उसळली होती. त्यामुळे वाहतूकही काहीकाळ विस्कळीत झाली. जिवीत हानी झाली नसली तरी 25 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.