होमपेज › Satara › कडेगाव-पलूसच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा काँग्रेसला पाठिंबा-जयंत पाटील

कडेगाव-पलूसच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा काँग्रेसला पाठिंबा-जयंत पाटील

Published On: May 03 2018 1:26PM | Last Updated: May 03 2018 1:26PMकराड : प्रतिनिधी 

सांगलीतील पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उभा करणार नसल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

ज्येष्ठ नेते, स्व. पी. डी. पाटील यांना त्यांच्या निवासस्थानी अभिवादन केल्यानंतर आ. जयंत पाटील यांनी कराड (जि. सातारा)  येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, दिलीप पाटील, राष्ट्रवादीचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनिल माने, कराड पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस पार्टी यांच्यात जागा वाटपाबाबत चर्चा सुरू होती. काँग्रेसचे सरचिटणीस मोहन प्रकाश व राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांच्यासह वरिष्ठांशी विचारविनिमय करुन निर्णय घेतले आहेत. लोकसभेच्या दोन जागा गोंदिया राष्ट्रवादी पार्टी व पालघर काँग्रेस पक्ष लढवेल. विधानसभेची पलूसची जागा ज्येष्ठ नेते डॉ पतंगराव कदम यांचे निधन झाल्यामुळे या पलूस जागेवर डॉ. विश्वजित कदम लढतील असे दिसते. काँग्रेस पक्षाला पलूस जागेसाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा देण्याची घोषणा आज मी या ठिकाणी करीत आहे. पलूसच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपला उमेदवार उभा करणार नाही. असेही जयंत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

Tags : NCP, support, congress, kadegaon-palus, Byelection, jayant patil