Tue, Feb 18, 2020 06:37होमपेज › Satara › राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार सातार्‍यात दाखल (video)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार सातार्‍यात दाखल (video)

Published On: Sep 22 2019 11:52AM | Last Updated: Sep 22 2019 2:22PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषी मंत्री खा शरद पवार यांनी डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधी स्थळावर जाऊन अभिवादन केले. सातारा : प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषी मंत्री खा शरद पवार आज(दी.२२) सातारा दौऱ्यावर आहेत. साताऱ्यात पोहचताच जिल्यातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले.  यावेळी पदाधिकारी युवक कार्यकर्त्यांनी 'मी शरद पवार',  'आम्ही साहेबांसोबतच' अशा गांधी टोप्या परिधान करून नागरिकांचे लक्ष वेधले. 

पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषी मंत्री खा शरद पवार यांनी डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधी स्थळावर जाऊन अभिवादन केले.