Thu, Feb 21, 2019 14:00होमपेज › Satara › राष्ट्रवादीच्या महिलांचा मंत्री तावडेंना घेराव (Video)

राष्ट्रवादीच्या महिलांचा मंत्री तावडेंना घेराव (Video)

Published On: Sep 05 2018 1:00PM | Last Updated: Sep 05 2018 1:00PM
सातारा : प्रतिनिधी
आमदार राम कदम यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आक्रमक होत राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना घेराव घातला. यावेळी बेताल वक्तव्य करणाऱ्यांची हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली.
आमदार राम कदम यांनी मुंबईत दहीहंडीवेळी केलेल्या मुलींबद्दलच्या वक्तव्यावर बेभानपणे केलेल्या वक्तवावर राष्ट्वादी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी महिलासह शासकीय विश्राम गृहात मंत्री तावडे यांना घेराव घातला.  ‘राम कदमांवर कधी कारवाई करणार? अशांना पक्षातून हाकलून द्या? असला कचरा पक्षात ठेऊ नका असे सांगत त्यांच्यावर कारवाई काय करणार? असा जाब विचारत तावडेंना घेराव घालण्यात आला.

(व्हिडिओ : इम्तियाज मुजावर)