Sun, Mar 24, 2019 04:09होमपेज › Satara › जमिनीच्या वादातून वाकेश्‍वर येथे खून

जमिनीच्या वादातून वाकेश्‍वर येथे खून

Published On: Feb 26 2018 1:18AM | Last Updated: Feb 25 2018 10:30PMवडूज : वार्ताहर

वाकेश्‍वर, ता. खटाव येथील जमिनीच्या कारणावरून झालेल्या भांडणात महादेव मुगूटराव फडतरे (वय 63) यांचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबत वडूज पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रविवार, दि. 25 रोजी  सकाळी 11.30 च्या सुमारास गुलाब फडतरे, संतोष फडतरे, गणेश वाघ हे संगनमत करून महादेव फडतरे यांच्या जमिनीत अतिक्रमण करत जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने ताल तोडत होते. त्यांना महादेव फडतरे व फिर्यादी यांनी 

समजावयाचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यांचे काही न ऐकता मृत व्यक्‍ती व फिर्यादीचा भाऊ यांना  शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. यामध्ये महादेव फडतरे यांच्या छातीवर मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर फिर्यादीचा भाऊ महेश फडतरे यांच्या मांडीला संतोष फडतरे याने चावा घेऊन जखमी केले असल्याची फिर्याद महेंद्र महादेव फडतरे यांनी वडूज पोलिस ठाण्यात दाखल केली. उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत काळे, पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के यांनी घटनास्थळावर धाव घेतली व शिताफीने तिघा आरोपींना ताब्यात घेतले. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक धरणीधार कोळेकर करीत आहेत.