Thu, Jun 04, 2020 00:04होमपेज › Satara › साताऱ्यात वाहतूक पोलिसाला लोटांगण घालून आंदोलन

साताऱ्यात वाहतूक पोलिसाला लोटांगण घालून आंदोलन

Last Updated: Oct 10 2019 12:56PM

सातारा : लोटांगण घालत अंगावर दुचाकी घेऊन पोलिसाविरुद्ध आंदोलनसातारा : प्रतिनिधी

येथील पोवई नाक्यावर गुरुवारी सकाळी दुचाकी चालकाची व वाहतुक पोलिसाची जोरदार बाचाबाची झाली. दूचाकी चालकाने वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालत कागदपत्रे असताना तुम्ही अडवलेच का? असे मोठमोठ्याने ओरडत रस्त्यावरच लोटांगण घातले. तसेच, दुचाकी अंगावर घेऊन वाहतूक पोलिसांविरुद्ध थेट आंदोलनच छेडले. या घटनेमुळे पोवई नाक्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

वाहतूक पोलिस दुचाकी चालकाची समजूत काढत असताना तो चालक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. पाहता- पाहता या घटनेमुळे बघ्यांची गर्दी झाली. अखेर क्रेनला घटनास्थळी पाचारण केल्यानंतर त्या दुचाकी चालकाने आणखी गोंधळ घातला. दुचाकी चालकाने क्रेनवरील दुचाकी अंगावर ओढून घेत दुचाकी चालक रस्त्यावर झोपल्याने पोलिसांची चांगलीच पंचाईत झाली.