Fri, Sep 21, 2018 05:40होमपेज › Satara › महाबळेश्वरमध्ये घरफाळा वाढीविरोधात मोर्चा

महाबळेश्वरमध्ये घरफाळा वाढीविरोधात मोर्चा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

महाबळेश्वर(सातारा) : वार्ताहर

महाबळेश्वर नगरपरिषदेने केलेल्या अन्यायकारक घरफाळा वाढीविरोधात महाबळेश्वर घरपट्टी वाढ विरोधी कृती समितीच्या वतीने नगरपरिषदेवर मोर्चा काढून निवेदन दिले. यावेळी सर्वपक्षीय नेते, व्यापारी, व्यावसायिक, हॉटेल मालकांचा या मोर्चात सहभाग होता. शेकडो मिळकतधारक सहभागी झाले होते. 

या मोर्चाची सुरुवात शिवाजी चौक येथून झाली. मोर्चा मुख्य बाजारपेठ, सुभाष चौक, एसटी स्थानक मार्गे महाबळेश्वर पालिकेवर पोहचला. महाबळेश्वर घरपट्टी वाढ विरोधी कृती समितीच्या वतीने मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे, दत्ताभाऊ वाडकर, विजय नायडू, धोंडीराम जाधव, सलीम बागवान, नगरसेवक संदिप साळुंखे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
 

Tags : satara, satara news, mahabaleshwar, morcha


  •