Mon, May 27, 2019 01:24होमपेज › Satara › फलटण : सावकारी प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

फलटण : सावकारी प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Published On: Dec 28 2017 10:01PM | Last Updated: Dec 28 2017 10:01PM

बुकमार्क करा
फलटण :  प्रतिनिधी 

होळ (ता.फलटण) येथील एकास व्याजाच्या पैशाच्या कारणावरून त्याच्या घरातील लोकांना दमदाटी व धमकी दिल्याप्रकरणी फलटण येथील तिघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत फलटण शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीप भीमराव भोसले (वय 45 रा.होळ ता.फलटण) यांना रवींद्र अरविंद काकडे, आबा बापू काकडे, शामराव हिरामण जाधव सर्व रा.फलटण यांनी 12 लाख 50 हजार रुपये व्याजाने दिले होते. ते आजपर्यंत 14 लाख 35 हजार फिर्यादी भोसले यांनी दिलेले असताना एकूण रकमेपेक्षा 1 लाख 85 हजार देऊनही फिर्यादीच्या घरात घुसून फिर्यादी व त्यांची पत्नी व आई यांना पैशाची मागणी केली. तसेच फिर्यादीस मोबाईलवरून पैशाची मागणी करून धमकी दिली. या प्रकरणी तिघा संशयित आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक दळवी करीत आहेत.