Sat, Jul 20, 2019 15:14होमपेज › Satara › सावकारीप्रकरणी दोघांवर गुन्हा

सावकारीप्रकरणी दोघांवर गुन्हा

Published On: Apr 12 2018 1:18AM | Last Updated: Apr 11 2018 11:32PMम्हसवड : प्रतिनिधी

व्याजाने घेतलेले 80 लाख रुपये व्याजासह परत करूनही तारण असलेला मुंबई येथील 23 लाख रुपये किमतीचा फ्लॅट परत देण्यास टाळाटाळ करणार्‍या वरकुटे-म्हसवड (माळवाडी, ता. माण) येथील दोघाजणांवर सावकारी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, फिर्यादी अमोल राऊत (वय 35, रा. म्हसवड) याचा दहिवडी येथील मित्र तुषार पुस्तके  यास घरगुती कारणासाठी 80 लाख रुपयांची गरज होती. यासाठी अमोल राऊत हे तुषार पुस्तके यांना घेऊन वरकुटे-म्हसवड (माळवाडी) येथील भगवान नामदेव विरकर व जनार्दन भगवान विरकर यांच्याकडे घेऊन गेले होते. विरकर यांनी ही रक्‍कम 6 टक्के व्याजाने देण्याचे मान्य केले. यासाठी पुस्तके यांनी फलटण, दहिवडी, म्हसवड, हिंगणी येथील विविध मालमत्ता तारण दिल्या होत्या. त्यानुसार विरकर यांनी पुस्तके यांना 80 लाख रुपये दिले. या रकमेची परतफेड करत असताना व्याजाची  10 लाखाची रक्कम थकली. यासाठी परत विरकर यांना अमोल राऊत याचा भाऊ बाबासो साहेबराव राऊत याचा मुंबई येथील फ्लॅट तारण ठेवला.

दरम्यान, अमोल राऊत व तुषार पुस्तके  यांनी विरकर यांच्याकडून घेतलेले 80 लाख रुपये व त्याचे व्याज परत केले. मात्र, व्याजापोटी मुंबई येथील फ्लॅट वारंवार मागणी करूनही परत दिला नाही. उलट फ्लॅट परत करण्याची मागणी केली असता तो फ्लॅट आम्ही विकत घेतला असून पुन्हा फ्लॅट परत मागितला तर खंडणीचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी देत राऊत यांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्याविरोधात भगवान नामदेव विरकर व जनार्दन भगवान विरकर यांच्या विरोधात म्हसवड पोलिसात सावकारी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Tags : satara, satara news, crime, Money lending case,