Wed, Jan 16, 2019 04:51होमपेज › Satara › महाबळेश्‍वर येथे डॉक्टरकडून विनयभंग 

महाबळेश्‍वर येथे डॉक्टरकडून विनयभंग 

Published On: Mar 14 2018 12:49AM | Last Updated: Mar 14 2018 12:29AMमहाबळेश्‍वर : वार्ताहर

सातारा येथील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी महाबळेश्‍वर येथील डॉ. नंदकिशोर भांगडिया यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा महाबळेश्‍वर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. महाबळेश्‍वर येथील डॉ. नंदकिशोर भांगडिया यांच्या भानगडीचा पर्दाफाश झाल्याने डॉक्टराबाबत महाबळेश्‍वरमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, भांगडिया हे दोन वेळा महाबळेश्‍वर नगरपालिकेत नगरसेवक होते.   

याबाबत महाबळेश्‍वर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, संबंधित महिला व तिची मैत्रीण अशा दोघी मंगळवारी दुपारी 12. 30 वाजण्याच्या सुमारास महाबळेश्‍वर येथे राजश्री महिला विकास सामाजिक संस्था सातारातर्फे वर्गणी गोळा करण्यासाठी आल्या होत्या. यावेळी फिर्यादी महिलेच्या अचानक पोटात दुखायला लागले.

त्यामुळे फिर्यादी महिला ही ताणू पटेल स्ट्रीट येथील रोडच्या डाव्या बाजूस असलेल्या डॉ.भांगडीया यांच्या दवाखान्यात आपल्या मैत्रिणीसोबत गेली. त्यावेळी डॉक्टर व कंपाउंडर दवाखान्यामध्ये हजर होते. तसेच तेथे कोणीही पेशंट नव्हते.  त्यावेळी फिर्यादी महिला डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेली. तिच्यासोबत आलेली महिला बाहेरील बाजूस थांबली.

डॉक्टरांनी तेथे असलेल्या कंपाउंडरला मुद्दामून तिकीट आणायला सांगून बाहेर पाठविले. यावेळी डॉक्टरने  फिर्यादी महिलेस आतमधील स्वतंत्र केबिनमध्ये तपासणी करीत असताना तिच्याशी अश्‍लील चाळे केले. त्यामुळे संबधित महिला घाबरुन गेली. त्यानंतर डॉक्टरांनी कागदावर औषधे लिहून दिली. मात्र त्या महिलेकडून त्याने पैसे घेतलेच नाहीत. 

केबिनमधून बाहेर आल्यानंतर संबधीत महिलेने हा सर्व प्रकार सोबत असलेल्या महिलेस सांगितला.   त्यानंतर लगेचच त्या दोघी महिलांनी महाबळेश्‍वर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी डॉ. नंदकिशोर भांगडीया यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर महाबळेश्‍वर पोलिसांनी  डॉ.भांगडीयाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षण दत्तात्रय नाळे,पो.ना.सुनीता डोईफोडे करीत आहेत.