Sun, Mar 24, 2019 12:50होमपेज › Satara › विनयभंगप्रकरणी ४ वर्षे शिक्षा

विनयभंगप्रकरणी ४ वर्षे शिक्षा

Published On: Nov 30 2017 11:55PM | Last Updated: Nov 30 2017 11:50PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी संतोष ऊर्फ बाळू चंद्रकांत सोनावणे (वय 30, रा. शिंदेवाडी, ता. खंडाळा) याला पहिले तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. व्ही.घुले यांनी 4 वर्षे सक्‍तमजुरीची शिक्षा व 3 हजार रुपये दंड, तो न दिल्यास 3 महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली. दरम्यान, घटनेनंतर दोन वर्षांतच याचा निकाल लागला.

याबाबतची माहिती अशी, की दि. 1 नोव्हेंबर 2015 रोजी पीडित आठ वर्षीय मुलगी सायंकाळी खेळत होती. त्यावेळी संशयित बाळू सोनावणे याने तिच्याशी गैरवर्तन केले. काही वेळानंतर घटनेबाबत मुलीच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी शिरवळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.

शिरवळ पोलिस ठाण्याचे फौजदार जी. जी. बोबडे यांनी घटनेचा तपास केल्यानंतर संशयिताविरुद्ध जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा न्यायालयात बचाव व सरकार पक्षाच्या वतीने युक्‍तिवाद करण्यात आला. सरकार पक्षाचा युक्‍तिवाद ग्राह्य धरून न्यायाधिशांनी बाळू सोनावणे याला शिक्षा ठोठावली. प्रॉसिक्युशन स्कॉडचे फौजदार कबुले, पोलिस हवालदार सतीश पवार, अजित शिंदे, नंदा झांझुर्णे, कांचन बेंद्रे, सावंत यांनी सहकार्य केले.