Tue, May 26, 2020 17:30होमपेज › Satara › आधुनिकतेमुळे बलुतेदारी पद्धत बंद

आधुनिकतेमुळे बलुतेदारी पद्धत बंद

Published On: Sep 21 2018 1:19AM | Last Updated: Sep 20 2018 8:04PMचाफळ : वार्ताहर

आधुनिकतेच्या युगात तंत्रज्ञानावर आधारित शेती पध्दती सुरु झाली धान्य देऊन सण आणि उत्सवात तसेच शेती अवजारे करून घेण्याची पध्दत लोप पावली आहे. बलुतेदारांची सध्याची पिढी धान्याच्या मोबदल्यात काम करण्यास तयार नसल्याने पुर्वापार चालत आलेली बलुते पध्दत कालबाह्य ठरु लागली आहे.

फार वर्षापासून ग्रामीण भागात बलुतेदारांची बैत्यांची परंपरा चालत आली आहे. पुर्वजांना शेती व अन्य कामातून सणसभारंभासाठी वापरात येणार्‍या वस्तूंची देवाण घेवाणीसाठी वेळ मिळत नसल्याने ही बलुतेदारी आस्तित्वात आली होती.पारंपरिक सण सभारंभावर या बारा बलुतेदारांचा हक्क असाच वर्षभरातील तिथी आणि कालामानानुसार साजर्‍या होणार्‍या नागपंचमी, गौरी, गणपती, भूमीपूजन, दिवाळी,मकर संक्रांत आदी सणांमध्ये लागणारे मातीचे नागोबा,सुगडे,घट,मातीची बैले,गौरी गणपतीच्या मूर्ती इत्यादीसाठी कुंभार बांधवांचा मान असे. त्यांनी दिलेल्या मूर्ती वस्तूंच्या बदल्यात त्यांना धान्य दिले जाई.पूर्वीच्या काळात शेती कामासाठी धान्य देवून शेतीतील सुगीची कामे करून घेतली जात. तसेच शेतीच्या मशागतीसाठी लागणारी औजारे बनवणे त्यांची डागडुजी करणे ही कामे बलुतेदारांकरवी केली जात असत मोबदल्यामध्ये त्यांनी वर्षभरातील खरीप व रब्बी हंगामाची सांगता झाल्यावर पैशाऐवजी धान्य दिले जाई.वर्षभर त्या बदल्यात हे बलुतेदार या वस्तू व सेवा शेतकरी वर्गाला पुरवत असत दोघांमध्ये देवाणघेवाण होते असे .मात्र बलुतेदारांची नवीन पिढी उच्च शिक्षीत होत असल्याने व मिशिनरीच्या जमान्यात हे पारंपरिक व्यवसाय करण्यास तयार नसल्याचे चित्र दिसत आहे.

नागपंचमी, गौरी, गणपती, भूमीपूजन, दिवाळी, मकरसंक्रांत इत्यादी सणांमध्ये लागणारे देवी देवतांच्या मूर्ती साहित्य बाजारपेठेत तयार मिळू लागले आहे. हीच अवस्था इतर बारा बलुतेदार म्हणजेच माळी,सुतार, लोहार, चर्मकार, नभिक आदींच्याबाबतही आहे. सर्वच घटकांतील परिस्थिती बदलली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतमालाचा भरोसा देता येत नाही. त्यामुळे कामाच्या बदल्यात धान्याऐवजी पैशाच्या स्वरूपात मोबदला घेतला जावू लागल्याने बलुतेदारांची दुकानदारी प्रचलित होवू लागली आहे. ग्रामीण भागातील बलुतेदारांनी आता व्यावसायिकता अंगीकारली असून ही मंडळी सण उत्सवाच्या काळात गावांगावात दुकाने थाटत आहेत.