होमपेज › Satara › मिरजेत सातारच्या विवाहितेवर जादुटोणा  

मिरजेत सातारच्या विवाहितेवर जादुटोणा  

Published On: Jul 02 2018 1:49AM | Last Updated: Jul 01 2018 11:48PMमिरज : शहर प्रतिनिधी

घरात शांती मिळावी व आजारपण जावे यासाठी मिरजेत एका विवाहितेवर जादुटोणा करून औषध पाजण्यात आले. याप्रकरणी शहर पोलिसांनी विजापूरचा मांत्रिक, विवाहितेची सासू रुक्मिणी पवार (रा. खोतनगर, मिरज) व शंकर चुनांडे (रा. भोर) या तिघांविरुद्ध जादुटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.    

याबाबत पूजा आबासाहेब पवार (वय 25, सध्या खोतनगर, मिरज, मूळ रा. सातारा) या विवाहितेने तक्रार दिली आहे. पूजाचा विवाह दोन वर्षांपूर्वी आबासाहेब याच्याशी झाला होता. त्यांना एक मुलगी आहे. घरामध्ये शांती मिळावी व पूजा हिचा आजार जावा, असे कारण पुढे करून जानेवारी 2018 मध्ये तिची सासू रुक्मिणी पवार व रुक्मिणीचा भाऊ शंकर चुनांडे या दोघांनी एका मांत्रिकाद्वारे जादू टोणा केला. विजापूरच्या एका मांत्रिकाला घरी बोलावले. त्या मांत्रिकाने पुजावर तंत्र मंत्र करून लिंबू पाणी पिण्यात दिले. त्यानंतर एकऔषध पिण्यास दिले. त्यानंतर मात्र पूजा ही वारंवार आजारी पडत गेेली. तिची आजही प्रकृती गंभीर आहे. ती सध्या माहेरी राहण्यास गेली आहे. 

तिथेच रूग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिने तिच्या भावाच्या मदतीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आज पोलिसांनी  मांत्रिक, पिडीत विवाहितेची सासू ऋक्मीणी पवार, सासूचा भाऊ शंकर चुनांडे या तिघांविरूद्ध महानरबलीव इतर अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा व जादु टोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.