Wed, Jun 26, 2019 12:22होमपेज › Satara › माणमध्ये काकाकडूनच चिमुरडीवर अत्याचार

माणमध्ये काकाकडूनच चिमुरडीवर अत्याचार

Published On: Jun 04 2018 1:07AM | Last Updated: Jun 03 2018 11:23PMम्हसवड : प्रतिनिधी

माण तालुक्यातील एका गावात पाच वर्षीय चिमुरडीवर तिच्या चुलत काकानेच अत्याचार केला असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणात सहकार्य केल्याप्रकरणी त्याची पत्नी व सख्खी चुलती यांच्यावरही पीडित मुलीच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला आहे. 

माण तालुक्यातील उत्तरेतील एका गावामध्ये पीडित मुलगी राहते. या मुलीची आई दि. 16 मे रोजी घर सोडून गेली होती. यानंतर तिचा तपास केला ती कुंडल येथे तक्रारदार यांच्या चुलत भावाजवळ राहत असल्याचे समोर आले. यावेळी तक्रारदार यांनी पत्नीला मुलींसह घरी नांदायला येण्यास सांगितले. मात्र, या गोष्टीला तिने नकार देत चुलत दिराजवळच राहणार असल्याचे सांगितले. दि. 1 जून रोजी रात्री तक्रारदाराचा चुलत भाऊ, सख्खी चुलती यांनी पीडित मुलीची आई व दोन मुलींना गावातील व्यायाम शाळेजवळील स्मशानभूमी जवळच्या रस्त्याकडेला सोडले. ही बाब तक्रारदार यांनी पाहिले.

तक्रारदार यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता लहान मुलगी ओरडत असल्याचा आवाज आला. तोपर्यंत परिसरात इतर लोकही जमा झाले. संबधित सर्वांनी आवाजाच्या दिशेने जवळ जाऊन पाहिले असता  तक्रारदार यांचीच 5 वर्षाची लहान मुलगी विव्हळत पडली असल्याचे दिसून आले. ती आपलीच मुलगी असल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदर यांनी पीडित मुलगी, बायको व मुलींना घरी नेले. घरी गेल्यावर यातील 5 वर्षीय मुलीला प्रचंड त्रास होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला उपचारासाठी दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता मुलीवर अत्याचार झाल्याचे समोर आले. या घटनेने तक्रारदार घाबरून गेले. त्यांनी अधिक चौकशी केल्यानंतर चुलत भावानेच मुलीवर गैरकृत्य केले असल्याचे समोर आल्याने म्हसवड पोलिस ठाण्यात तशी तक्रार दिली.