Wed, Mar 20, 2019 02:34होमपेज › Satara › जन्मदात्याकडून पोटच्या मुलीवर बलात्कार

जन्मदात्याकडून पोटच्या मुलीवर बलात्कार

Published On: Apr 11 2018 6:58PM | Last Updated: Apr 11 2018 7:24PMकराड : प्रतिनिधी 

जन्मदात्या बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्‍कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना पुणे येथे जुलै 2017 ते जानेवारी 2018 या कालावधीत घडली असून, घटनेची नोंद कराड तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे.

पुणे येथे वास्तव्यास असणारे एक कुटुंब मूळचे कराड तालुक्यातील आहे. पुण्यात संबंधित मुलीची आई मोलमजुरीचे काम करते. तर भाऊ एका ठिकाणी रात्रभर, तसेच दिवसा दुपारपर्यंत काम करतो. नराधम बाप काहीही काम करत नाही. 

आई पहाटेच्या सुमारास, तर भाऊ रात्री दहाच्या सुमारास कामाला जातात आणि त्यामुळे संबंधित मुलगी आणि बाप हे दोघेच घरी असतात. ही संधी साधत जुलै 2017 मध्ये सर्वप्रथम नराधम बापाने मुलीवर अत्याचार केला. 

त्यानंतर ऑक्टोबर आणि जानेवारी 2018 मध्येही दोनवेळा अत्याचार केला. त्यानंतर संबंधित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी कराड तालुका पोलिस ठाण्यात नराधम बापाविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात येऊन हा प्रकार पुण्यात घडल्याने तो गुन्हा पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.