Tue, Nov 20, 2018 01:55होमपेज › Satara › अल्पवयीन मुलीवर बलात्कार; एकास अटक

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; एकास अटक

Published On: Dec 02 2017 12:36AM | Last Updated: Dec 01 2017 10:08PM

बुकमार्क करा

पिंपोडे बु॥ : वार्ताहर 

सोनके (ता. कोरेगाव) येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटनेतील संशयित आरोपी श्रीकांत जालिंदर शिंदे हा आज स्वतः वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात हजर झाला. बुधवारी (दि.29) रोजी पहाटेच्या वेळी ही घटना घडली होती.  पोलिसांनी त्यास अटक करून न्यायालयात हजर केले असता, सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

पीडित मुलगी व आरोपी एकाच  गावातील आहेत. पीडित मुलगी आपल्या घरात झोपलेली असताना आरोपी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दरवाजाच्या फटीतून हात घालून कडी काढून घरात घुसला. तिने विरोध केला असता तिचे तोंड व गळा दाबून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून बाजूच्या खोलीत झोपलेले तिचे आई- वडील जागे झाले.

त्यानंतर आरोपी पळून गेला. आरोपीवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपी घटना  घडल्यापासून फरार झाला होता. दोन दिवसांनंतर आज सकाळी सात वाजता श्रीकांत जालिंदर शिंदे हा  स्वतः वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक मयूर वैरागकर यांनी दिली.