Sat, Apr 20, 2019 15:53होमपेज › Satara › त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Apr 20 2018 9:03PM | Last Updated: Apr 20 2018 9:03PMफलटण : प्रतिनिधी

 बिजवडी, ता. माण (जाधववाडी) येथे  सततच्या जीवे मारण्याची धमकी आणि वडिलांवर मारहाणीचा खोटा गुन्हा दाखल झाल्यामुळे ओंकार शंकर जाधव (वय 17) याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी, ललिता भिमराव जाधव, प्रतिक भिमराव जाधव, प्रनिल भिमराव जाधव यांचा ओंकार जाधव यांचे वडील शंकर जाधव यांच्याशी घर जमीनीच्या वाटणी बाबत कोर्टात दावा सुरू आहे. यापूर्वी ललिता जाधव, प्रतिक जाधव, प्रनिल जाधव यांच्याशी घर मिळकत खाली करण्याच्या वादातून चुलते यशवंत बापु जाधव यांनी गळफास घेवुन आत्महत्या केली होती. गावच्या यात्रे दिवशी बिजवडी गावच्या स्टॅन्डवर गावातील लोकांच्या समोर ललिता जाधव हिने शंकर जाधव यांना मारहाण केली होती. तसेच गावच्या यात्रेमध्ये ओकांरला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच ओंकार याने मारहाण केल्याचा खोटा गुन्हा दाखल केला. याबाबत ओंकारने अनेकवेळा दहिवडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यास गेल्यास फक्त एन.सी दाखल करून घेवुन प्रत्येक वेळेस दहिवडी पोलीस स्टेशनचे स.पो.नि.प्रविण पाटील यांनी ललिता भिमराव जाधव, प्रतिक भिमराव जाधव, प्रनिल भिमराव जाधव यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पोलिस काहीही दखल घेत नव्हते म्हणून संबधित तिघांच्या विरोधात पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. याचा राग मनात धरून पाटील यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवतो असे म्हणून तक्रारीची दखल घेतली नाही. या त्रासाला कंटाळून शुक्रवारी सकाळी ओंकारने किटक नाशक पिउन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर ओंकारला फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.