Tue, Mar 19, 2019 20:52होमपेज › Satara › मांत्रिकासोबत अंघोळ करत नाही म्हणून विवाहितेचा छळ

मांत्रिकासोबत अंघोळ करत नाही म्हणून विवाहितेचा छळ

Published On: Apr 13 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 10:37PMम्हसवड : प्रतिनिधी

कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आण नाहीतर घटस्फोट दे यासाठी  शिवीगाळ मारहाण दमदाटी करुन मानसिक व शाररीक छळ केल्याची फिर्याद विवाहितेने म्हसवड पोलिस ठाण्यात केली आहे. तसेच मांत्रिकासोबत अंघोळ करत नाही म्हणून पती, दीर, सासूने मारहाण केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी म्हसवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तिचा विवाह 2006 मध्ये संशयीतासमवेत झाला होता. विवाहानंतर पती, सासू व दिराने कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावला. या कारणावरून वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण केली.

दरम्यान, एका मांत्रिकाने कर्ज व इतर अडचणीपासून सुटका होण्यासाठी विधी करावा लागेल, असे सांगून त्याच्यासमवेत अंघोळ करावी लागेल, असे सांगितले. त्यास नकार दिल्यांतर पती, दीर व सासुने शरीरिक व मानसिक छळ करून आपल्याला व दोन्ही मुलांना घरातून हाकलून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीनुसारी म्हसवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.