Fri, Apr 26, 2019 15:17होमपेज › Satara › मलकापूर नगरपालिकेबाबत पुढील आठवड्यात मुंबईत बैठक

मलकापूर नगरपालिकेबाबत पुढील आठवड्यात मुंबईत बैठक

Published On: Apr 14 2018 1:29AM | Last Updated: Apr 13 2018 10:25PMकराड : प्रतिनिधी

मलकापूर नगरपंचायतीची नगरपरिषद होणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य शासनाने त्यास त्वरित मंजुरी द्यावी, या मागणीसाठी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह नगरसेवकांनी महसूलमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. यावेळी डॉ. अतुल भोसले हेही उपस्थितीत होते. पुढील आठवड्यात सोमवारी अथवा मंगळवारी नगरसेवकांचे शिष्टमंडळ ना. पाटील यांच्यासह मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे यावेळी निश्‍चित करण्यात आले.

मलकापूर नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून शुक्रवारी प्रभाग आरक्षण सोडतही जाहीर करण्यात आली आहे. याच पार्श्‍वभूमीवर गुरूवारी नगरपंचायतीची बैठक होऊन त्यात सर्वानुमते मलकापूर नगरपरिषदेला मान्यता मिळावी, म्हणून ठराव करण्यात आला होता. तसेच यावेळी शुक्रवारी ना. चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेण्याचे निश्‍चित करण्यात आले होते.

त्यानुसार शुक्रवारी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव यांच्यासह त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी कृष्णा अभिमत विद्यापीठात ना. पाटील यांची भेट घेत त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. ना. पाटील यांनी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्याशी चर्चा करताना सकारात्मक द‍ृष्टीकोन दाखवला आहे. तर डॉ. अतुल भोसले यांच्यासह त्यांचे सहकार्‍यांसह सर्वांचीच नगरपरिषदेबाबत सकारात्मक भूमिका आहे. त्यामुळेच मलकापूर नगरपंचायतीची नगरपरिषद होऊन मलकापूरला आणखी दोन जादा नगरसेवक मिळण्याची आशा पल्लवीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

Tags : satara, karad, karad news, Malkapur municipality, Mumbai, Meeting,