Tue, Aug 20, 2019 04:07होमपेज › Satara › नगरपरिषदेसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार

नगरपरिषदेसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार

Published On: Feb 18 2018 2:03AM | Last Updated: Feb 17 2018 10:27PMकराड : प्रतिनिधी

मलकापूरचा वाढता विस्तार लक्षात घेता नगरपंचायतीची नगरपरिषद करणे शहराच्या दृष्टीने महत्वाचे व गरजेचे आहे. यासाठी पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटून साकडे घालण्यात येणार असून तसा निर्णय मलकापूर नगरंपचायतीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. यावेळी शहरातील रस्ते, स्वच्छ सर्व्हेक्षणात नागरिकांनी घेतलेला सहभाग यासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून लाखो रुपयांच्या विकास कामांना मंजूरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुनिता पोळ होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे प्रमुख उपस्थित होते. 
मलकापूर नगपंचायतीच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषयपत्रिकेवरील 40 विषयांसह ऐनवेळच्या विषयांवर सविस्तर चर्चा करून त्यांना सर्वानुमते मंजूरी देण्यात आली.

मलकापूर शहराचे झपाट्याने नागरीकरण वाढत असून नगरंपचायतीची नगरपरिषद करणे गरजेचे आहे. निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यापुर्वीच मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना भेटून लवकरात लवकर मलकापूरला नगरपरिषदेचा दर्जा देण्याबाबत साकडे घालण्याची गरज आहे. आपण सवार्ंनी मुख्यमंत्र्यांना भेटून पाठपूरावा केला तर बरे होईल, अशी सुचना उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी मांडली. त्याला नगरसेवक हणमंतराव जाधव यांच्यासह सर्व नगरसेवकांनी सहमती दर्शवत मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. 

सभेत सांडपाणी योजनेचे काम मार्च अखेर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णयही सभेत घेण्यात आला. सांडपाणी योजनेचे काम मार्च अखेर पुर्ण झाले नाही तर त्या कामासाठी मिळालेला निधी परत जाण्याची भीती आहे. त्यामुळे सर्व पदाधिकारी व अधिकार्‍यांवर विश्‍वास ठेवून मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत  मी वरिष्ठांना मार्च अखेर हे काम पुर्ण करण्याचे लेखी आश्‍वासन दिले असल्याचे मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी सांगितले. त्यावर विकासासाठी मिळालेला निधी परत जाणे मलकापूरसाठी भुषणावह नाही. आजपर्यंत मलकापूरसाठी आलेला निधी परत गेला नाही. यावेळीही तो जाणार नाही, असा सर्वांच्यावतीने मी शब्द देतो असेही मनोहर शिंदे यांनी सांगितले.  यावेळी शहरातील रस्ते तसेच इतर लाखो रुपयांच्या विकास कामांना मंजूरी देण्यात आली.