Tue, Jul 16, 2019 00:05होमपेज › Satara › मुंबईच्या माऊली फौंडेशनच्या सामाजिक सेवेने वारकरी तृप्त

मुंबईच्या माऊली फौंडेशनच्या सामाजिक सेवेने वारकरी तृप्त

Published On: Jul 24 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 8:26PMफलटण : प्रतिनिधी

माऊलींच्या सोहळ्यामध्ये गेली अनेक वर्षे अविरत सेवा देण्यामध्ये अग्रेसर असलेल्या कळंबादेवी मुंबई येथील माऊली फौंडेशनने वैद्यकिय सेवेबरोबर इतर अनेक सेवा वारकर्‍यांना फलटण मुक्कामादरम्यान दिल्याने वारकरी तृप्त झाले. 

वारकर्‍यांचा रोजचा 20 ते 25 कि.मी. चा पायी प्रवास म्हणजे वारकर्‍यांसाठी आजारांना निमंत्रणच, अशावेळी वैद्यकिय सेवा महत्त्वाची ठरते. जे भगवंताची सेवा करतात त्यांची सेवा करण्याचे पुण्य आपल्यालाही लाभावे या हेतूने प्रेरीत होवून  माऊली फौंडेशनचे 20 ते 25 नामांकीत डॉक्टर्स, पुरुष व महिलांची टीम, 30 ते 35 नामांकीत वकील, मुंबईस्थित अनेक मोठे व्यापारी आणि 30 शासकीय सेवानिवृत्त उच्चपदस्थ अधिकारी असा जवळपास 150 लोकांचा ताफा फलटणपासून पंढरपूरपर्यंत अव्याहतपणे वारकर्‍यांची सेवा करताना दिसून आला.

मुंबई येथील नाना जवंजाळ, डॉ. हनुमंत सिंघन, अ‍ॅड. विश्वनाथ टाळकुटे, जगदिश म्हात्रे, अंकुश देसाई, डॉ. जयंत ओक, डॉ. मच्छींद्र पाटील यांनी एकत्र येवून माऊली फौंडेशनची स्थापना केली आहे. वैद्यकिय सेवेबरोबर जवळपास 25 ते 30 हजार वारकर्‍यांना मोफत अन्नदानसेवा, मोफत रुग्णवाहिका, मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप अशा अनेक सेवा माऊली फौंडेशनमार्फत दिल्या गेल्या.  सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत सर्व वयोवृध्द व तरुण डॉक्टर्संनी रुग्णांवर मोठ्या उत्साहाने उपचार केले.  इंदोर येथील भालेराव, दिलीप संवत्सर, राजू मोरे, राकेश कपूर, गानबोटे, लांभे, अ‍ॅड. नामदेव शिंदे, अ‍ॅड. अविनाश अभंग यांनीही वारकर्‍यांच्या सेवेत सहभाग घेतला.