Thu, Jun 20, 2019 02:05होमपेज › Satara › माजगावजवळ मालट्रक उलटला; चालक जागीच ठार

माजगावजवळ मालट्रक उलटला; चालक जागीच ठार

Published On: May 22 2018 1:29AM | Last Updated: May 21 2018 11:36PMवेणेगाव : वार्ताहर 

पुणे- बेंगलोर महामार्गावर सातारा ते कराड जाणार्‍या लेनवर सातारा तालुक्यातील माजगाव गावच्या हद्दीत मालट्रकहायवेलगत असलेल्या लोखंडी बॅरिकेड्स तोडून उलटल्याने चालक जागीच ठार झाला. 

ही घटना सोमवारी मुंबईहून कोचिनला जात असताना दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात रणजित तानाजी चव्हाण (वय 34, रा. दहिगाव, ता. कोरेगाव) हे ठार झाले. हा अपघातएवढा भीषण होता की ट्रकचालकाच्या डोक्याला गंभीर जखम होऊन छाती दबल्याने रणजित चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मालट्रकची पुढील दोन चाके निखळून नुकसान झाले आहे. 

या घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृत्यूमुखी पडलेल्या रणजित चव्हाण यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला.

रणजित चव्हाण याचा दोन वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्यांच्या पश्‍चात पत्नी, आई, वडील, दोन विवाहित बहिणी, चुलते असा परिवार आहे. या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहाय्यक उपनिरीक्षक अशोक जाधव करीत आहेत.