Sun, Jul 21, 2019 05:36होमपेज › Satara › कराड : शेखर चरेगावकर यांच्या घरासमोर घोषणाबाजी(Video)

कराड : शेखर चरेगावकर यांच्या घरासमोर घोषणाबाजी(Video)

Published On: Aug 04 2018 10:08AM | Last Updated: Aug 04 2018 10:08AMकराड : प्रतिनिधी 

कराड (जि. सातारा) येथे राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांच्या निवासस्थानाबाहेर कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी घोषणाबाजी केली. त्यानंतर नामदार चरेगांवकर यांनी कार्यकत्यांसोबत चर्चा केली. यावेळी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही चरेगांवकर यांनी मराठा समाज बांधवांना दिली.

शेखर चरेगांवकर यांच्या घरासमोर एक मराठा लाख मराठा, आरक्षण तसेच अन्य मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत, अशी घोषणाबाजी मराठा समाज बांधवांनी केली. त्यानंतर मराठा बांधवांशी चरेगांवकर यांनी चर्चा केली. विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जातील अडचणी यासह विविध बाबीवर चर्चा केली. मराठा समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण पाठपुरावा करु, चाफळ येथील रोहन तोडकर यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे आश्वासन चरेगांवकर यांनी दिले आहे.