Sun, Nov 18, 2018 22:50होमपेज › Satara › हिंदुराव पाटील ठरले ‘किंगमेकर’

हिंदुराव पाटील ठरले ‘किंगमेकर’

Published On: May 29 2018 1:30AM | Last Updated: May 28 2018 10:26PMढेबेवाडी : विठ्ठल चव्हाण 

मंद्रुळकोळे व मंद्रुळकोळे खुर्द ग्रामपंचायतीत काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाने राष्ट्रवादीचे आ.नरेद्र पाटील व त्यांचे बंधू जि.प.सदस्य रमेश पाटील यांच्या गटाचा मोठया फरकाने धुव्वा उडवला. दोन्ही ग्रामपंचायतींवर हिंदुराव पाटील यांनी वर्चस्व राखले आहे. मंद्रुळकोळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अमोल पाटील हे निवडून आले तर मंद्रुळकोळे खुर्द ग्रामपंचायत सरपंचपदी सतीश कापसे यांनी विजय संपादन केला. 

मंद्रुळकोळे व मंद्रुळकोळे खुर्द ग्रामपंचायत निवडणूक निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. मंद्रुळकोळे ग्रामपंचायतीची सत्ता राष्ट्रवादीचे आ. नरेंद्र पाटील व जि.प.सदस्य रमेश पाटील यांच्या गटाकडे होती. याठिकाणी काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील यांनी सरपंचपदासह सात सदस्य निवडून आणत सत्तांतर घडवून राष्ट्रवादीला मोठा धक्‍का दिला. याठिकाणी सरपंचपदी अमोल पाटील विजयी झाले. तर मंद्रुळकोळे खुर्द ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा वर्चस्व राखत हिंदुराव पाटील यांनी आ.नरेंद्र पाटील गटाला धोबीपछाड केले आहे.

या ग्रामपंचायतीत सरपंचपदासह सहा  सदस्य निवडून आले. येथे सरपंच पदाच्या थेट निवडणुकीत सतीश कापसे विजयी झाले. मंद्रुळकोळे ग्रामपंचायतीत  काँग्रेसचे हिंदुराव पाटील यांच्या जोतिर्लिंग ग्रामविकास पॅनेलचे सरपंचपदाचे उमेदवार अमोल महादेव पाटील यांनी विरोधी आण्णासाहेब पाटील पॅनेलचे उमेदवार हिंदुराव यशवंत पाटील यांचा सुमारे 226 मतांनी पराभव केला. तर सदस्यपदी सर्जेराव पाटील, रत्नमाला धस, नीलम सुतार, पोपटराव कळंत्रे, शारदा सुतार, रेखा ढेब सदस्य निवडून आले. तर विरोधी आ. नरेंद्र पाटील गटाकडून संतोष अवघडे, संपतराव यादव, दिपाली पाटील, विजया जवंजाळ, संजय पाटील हे सदस्य निवडून आले. 

तर मंद्रुळकोळे खुर्दच्या ग्रामपंचायतीत सरपंचपदी सतीश अनंतराव कापसे यांनी विजय जयसिंग पाटील यांचा 221 मतांनी पराभव करून विजय संपादन केला. सदस्यपदी  काँग्रेसचे हिंदुराव पाटील गटाकडून दिलीप काटकर, कमल यादव, उज्वला रोडे, सुनीता साबळे, बाळकृष्ण कुंभार हे  सदस्य निवडून आले.