Thu, Aug 22, 2019 03:55होमपेज › Satara › फलटण : खासगी सावकारीतून एकाची आत्महत्या

फलटण : खासगी सावकारीतून एकाची आत्महत्या

Published On: Aug 18 2018 10:33AM | Last Updated: Aug 18 2018 10:33AMफलटण : प्रतिनिधी 

खासगी सावकारीच्या त्रासामुळे फलटण तालुक्यातील एकाने आत्महत्या केल्याची घटना काल रात्री घडली. आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या खिशात खासगी सावकरांची नावे, मोबाईल नंबर लिहलेली चिठ्ठी सापडली आहे. पोलिसांनी सावकारीविरोधात गुन्हा नोंद करण्यास नकार दिल्याने ग्रामस्थांनी पोलिस ठाण्याला घेराव घातला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, होळ ता.फलटण येथील विद्यमान उपसरपंच विनोद भोसले यांनी काल शुक्रवार दि.१७ रोजी रात्री ८ ते ९ च्या दरम्यान जिंती खुंटे रोडवर जिंती (कार्पोरेशन हद्द) येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर तेथून जाणाऱ्या लोकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी याची माहिती होळ व साखरवाडी भागातील लोकांना व ग्रामीण पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी अधिक तपास केला असता त्यांच्या खिशात चिट्ठी सापडली. त्यामध्ये त्यांनी चार ते पाच सावकारी लोकांची नावे रक्कम, त्यांचे मोबाईल नंबर व या चिट्ठीच्या चार झेरॉक्स काढून एक चिट्ठी शर्ट मध्ये, एक पॅन्ट मध्ये,एक दुचाकीच्या डिग्गीत व एक मोबाईलच्या कव्हर मध्ये ठेवली होती. मी खाजगी सवकारकीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे विनोद भोसले यांनी चिठ्ठीत म्हटले आहे.

दरम्यान, चिट्ठीच्या आधारे त्या चार ते पाच खाजगी सावकारांना अटक करा. त्यांना अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. यानंतर पोलिसांनी खाजगी सावकारीबाबतीत गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने होळसह साखरवाडी परीसरातील लोकांनी पोलिस ठाण्याला घेरले.