Mon, May 25, 2020 22:10होमपेज › Satara › सातारा : उरमोडी धरणात बुडून शेतकर्‍याचा मृत्यू

सातारा : उरमोडी धरणात बुडून शेतकर्‍याचा मृत्यू

Published On: Dec 12 2017 3:52PM | Last Updated: Dec 12 2017 3:52PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

उरमोडी धरणात बुडाल्याने रामचंद्र सखाराम मोरे (वय 54, रा.आरगडवाडी ता.सातारा) यांचा सोमवारी मृत्यू झाला. शेतीला पाणी देण्यासाठीची मोटार पाण्यात सोडत असताना ते धरणाच्या पाण्यात पडले होते. 

रामचंद्र मोरे यांची गावाजवळच असलेल्या बनग्याचे शेत याठिकाणी शेती आहे. उरमोडी धरणाच्या पाण्यात मोटार सोडत असतानाच पाय घसरुन ते पाण्यात पडून बुडाले होते. ते पाण्यात बुडाल्याचे समजताच परिसरातील इतर ग्रामस्थांनी शोधकार्य राबवले. त्यांना पाण्यातून बाहेर काढल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात मृत घोषीत करण्यात आले. याबाबतची प्राथमिक तक्रार किसन सखाराम मोरे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.