Sun, Jul 21, 2019 12:01होमपेज › Satara › मलकापूर नगरपंचायत झोपडपट्टी रहिवाशांना सहाशे घरे देणार 

मलकापूर नगरपंचायत झोपडपट्टी रहिवाशांना सहाशे घरे देणार 

Published On: Aug 22 2018 12:58AM | Last Updated: Aug 21 2018 11:19PMकराड : प्रतिनिधी

केंद्र शासन पुरस्कृत 2022 पर्यंत सर्वांसाठी घर या संकल्पनेवर आधारीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गंत मलकापूर नगरपंचायतीच्या वतीने झोपडपट्टी रहिवाशांना घरे देण्यात येणार आहेत. शहरातील तीनशे झोपडपट्टीधारकांना प्रत्येकी दोन घरे याप्रमाणे 600 घरे देण्यात येणार आहेत. यासाठी 15 कोटींचे अनुदान मिळणार असल्याची माहिती नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली.

मनोहर शिंदे यांनी सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गंत जमिनिचा साधन संपत्ती म्हणून वापर करणे कामांतर्गत येथील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्याअन्वये आगाशिवनगर येथे कराड शहरातून पुनर्विकास केलेल्या झोपडपट्टीधारकांना (ता. 7) नोव्हेंबर 2017 रोजीच्या सर्वसाधारण सभेत घेतलेल्या ठरावानुसार प्रत्येक झोपडपट्टी धारकास दोन घरे या प्रमाणे घरकुले बांधून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

सदरच्या नोंदी 2002-03 मधील असल्याने यामध्ये झोपडपट्टीधारकांच्या नावात बदल असण्याची शक्यता आहे. ज्यांची नावे यादीत समाविष्ठ नाहीत मात्र ते मिळकतदार आहेत, त्यांनाही या येजनेचा लाभ घेता येणार आहे. नावांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर योग्य त्या कागदपत्र व पुराव्यासहित 30 दिवसाच्या आत नगरपंचायतीच्या बांधकाम विभागाकडे सादर करावीत, असे अवाहन मनोहर शिंदे व नगरअभियंता मल्लिकार्जुन बनसोडे यांनी केले आहे.