Mon, May 27, 2019 01:16होमपेज › Satara › मलकापूर नगरपंचायत जिंकण्यासाठी तयारीला लागा

मलकापूर नगरपंचायत जिंकण्यासाठी तयारीला लागा

Published On: Mar 20 2018 1:50AM | Last Updated: Mar 19 2018 10:55PMकराड : प्रतिनिधी

मलकापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवून निवडणूक जिंकण्याच्या तयारीला लागावे, अशा सूचना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या. यावेळी त्यांनी मलकापूरचे विविध नागरी प्रश्‍न सोडविण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. मलकापूर येथे शेतीमित्र अशोकराव थोरात यांच्या घरी आयोजित भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. 

कराड तालुक्यातील विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने आलेले मंत्री पाटील यांनी अशोकराव थोरात यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर उपस्थित होते.

मलकापूर येथील भाजपा कार्यकर्त्यांसमवेत झालेल्या बैठकीत नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. यावेळी मलकापूरचे नगरसेवक हणमंतराव जाधव, सुरेश खिलारे, बाळासाहेब घाडगे, आबा गावडे, भाजपाचे मलकापूर शहराध्यक्ष सुरज शेवाळे, सुधाकर शिंदे आदी उपस्थित होते.

 

Tags : satara, Karad news, Malkapur, Nagar Panchayat, Election,