Wed, Aug 21, 2019 01:56होमपेज › Satara › मकरंद अनासपुरेंना उद्या कै.लक्ष्मणराव भरगुडे-पाटील जीवनगौरव पुरस्कार

मकरंद अनासपुरेंना उद्या कै.लक्ष्मणराव भरगुडे-पाटील जीवनगौरव पुरस्कार

Published On: Apr 23 2018 1:18AM | Last Updated: Apr 22 2018 10:36PMखंडाळा : वार्ताहर 

पळशी गावचे सुपुत्र व तालुक्याचे माजी सभापती कै. लक्ष्मणराव भरगुडे-पाटील यांच्या नावाने दिला जाणार जीवनगौरव पुरस्कार नाम फौंडेशनच्या माध्यमातून उल्लेखनीय कामकाज करणारे सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांना विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे - पाटील यांच्या हस्ते देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील यांनी दिली . 

पळशी,  ता .खंडाळा  गावचे सुपुत्र व तालुक्याचे माजी सभापती दिवंगत लक्ष्मणराव भरगुडे-पाटील यांच्या 36 वी पुण्यतिथी दि. 24  एप्रिल रोजी सायंकाळी 6 वा 30 मिनिटांनी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. पुण्यतिथीचे औचित्य साधत यंदा नाम फौडेशनचे व सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांना गौरवण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त जगदीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व साखर आयुक्त संभाजीराव कडू - पाटील, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल,  पोलीस अधिक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, प्रांताधिकारी अस्मिता मोरे, सहाय्यक पोलीस उपआयुक्त दत्तात्रय भरगुडे, विधानमंडळ सहसचिव अशोक मोहिते, उद्योजक मोहन भरगुडे, बाळासाहेब पळशीकर, नेवील अमरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सरपंच आशितोष भरगुडे-पाटील, अशोक भरगुडे यांनी केले आहे.

 

Tags : satara, satara news, Makarand Anaspure, Laxmanrao Bhargade Patil, Jeev Gaurav award,