Mon, Jun 24, 2019 16:35होमपेज › Satara › कालव्यांचा प्रश्‍न मार्गी लागणार : जिल्हाधिकार्‍यांकडून पाहणी

महू-हातगेघर कामास मुहूर्त

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 14 2017 11:07PM

बुकमार्क करा

कुडाळ : प्रतिनिधी

‘धरण उशाला, कोरड घशाला’ या मथळ्याखाली काही दिवसांपूर्वी दै.‘पुढारी’ने महू-हातगेघर धरणाच्या रखडलेल्या कामावर प्रकाश टाकला होता. याची दखल घेत गुरूवारी खुद्द जिल्हाधिकार्‍यांनी धरणाची पाहणी करून धरणग्रस्तांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यांनी पाहणी केल्यानंतर तात्काळ यंत्रणा कामाला लागली. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार धरणाचे पिचिंग व कालव्यांची कामांना सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

गेल्या 20 वर्षांपासून महू-हातगेघर धरणाचे काम रखडले होते. याबाबत दै.‘पुढारी’ने सातत्याने पाठपुरावा करून शेतकरी व धरणग्रस्तांच्या समस्या जिल्हा प्रशासनासमोर मांडल्या होत्या. 
अखेर याची दखल घेत जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी गुरूवारी धरणस्थळाला भेट दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, प्रांताधिकारी सौ. स्वाती देशमुख, विजय घोगरे, तहसिलदार सौ. रोहिणी आखाडे उपस्थित होत्या. 

धरणग्रस्तांना जर कोणी त्यांच्या जमिनी ताब्यात देण्यासाठी धाक धडपशाही दाखवत असेल तर व संपादित झालेल्या जमिनी कोणी ताब्यात देत नसेल तर त्यांच्यावर महसूल विभागाकडून कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिला महू धरणावर वाहगाव येथील शेतकरी व धरणग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व धरणाच्या कामाच्या सूचना देण्यासाठी सिंघल आल्या होत्या. यावेळी त्यांनी धरणाच्या अपूर्ण कामावरून अधिकार्‍यांना झाडले. यावेळी सिंघल म्हणाल्या, शासनाच्या निधीतून सिंचनाचे 99 प्रकल्प सूरू होत आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील 26 व सातारा जिल्ह्यातील 5 प्रकल्प आहेत. महू-हातगेघरसाठी आवश्यक तो निधी केंद्र व राज्य सरकारकडून मिळाला आहे.त्यामुळे धरणाचे रखडलेले काम सुरू