Thu, Apr 25, 2019 21:31होमपेज › Satara › आधी पुर्नवसन मगच धरण (व्हिडिओ)

आधी पुर्नवसन मगच धरण (व्हिडिओ)

Published On: Jan 19 2018 6:24PM | Last Updated: Jan 19 2018 6:24PMकुडाळ : प्रतिनिधी 

शासन कोणाचे आहे, त्याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही, धरणग्रस्थाचे, आधी ‘पुर्नवसन मगच धरण’ अशी प्रमुख मागणी करत महु हातगेघर धरणग्रस्तांनी साखळी उपोषण आणि आंदोलन केले. यावेळी  महु हातगेघरसह वहागान, कवडी, काटवली, रईघर, घोटेघर, दापवडी गावातील हजारो धरणग्रस्त उपस्थित होते. 

‘निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने निधी आणण्याचे ढोंग केले, वास्तविक हा निधी राष्ट्रवादीच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाला. त्याचे श्रेय घेतले जात आहे, असे आमदार शिवेंद्रराजे भोसले म्हणाले. धरणग्रस्ताच्या संसारावर पाय ठेऊन जर भाजप धरण पूर्ण करणार असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही,  असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला. 

नागरिकांना दूरपर्यंत दिसणारी जमिन नाहिशी झाली. आमचे सरकारकचे आमच्याकडे दुकलकोणतीही सरकारी कामे वेळेवर होत नाहीत. पक्षी, प्राणी, नागरिक वंचित झाले, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.