Tue, Jun 02, 2020 00:19
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › रस्ता सुरक्षिततेच्या जनजागृतीसाठी साताऱ्यात महावॉकथॉन

रस्ता सुरक्षिततेच्या जनजागृतीसाठी साताऱ्यात महावॉकथॉन

Last Updated: Nov 30 2019 8:29PM
सातारा : प्रतिनिधी

रस्ता सुरक्षा, नो हॉर्न व जबाबदार ड्रायव्हिंग बद्दल जनजागृती करण्यासाठी परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व सीएएसआय व सीएसआर डायरी या सामाजिक संस्थामार्फत शनिवारी साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या महावॉकथॉनचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्वेता सिंघल व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. या महावॉकथॉनमध्ये विविध संदेशातून रस्ता सुरक्षिततेची जनजागृती करण्यात आली.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून महावॉकथॉनच्या रॅलीला प्रारंभ झाला. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयापासून जिल्हा परिषद, सैनिक स्कूल मैदान, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, शिवाजी महाविद्यालय ते उपप्रादेशिक कार्यालय अशी ही रॅली काढण्यात आली. अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी महावॉकथॉन बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.एम.एच. अकरा आता हॉर्न विसरा, बंद करा बंद करा हॉर्नबाजी बंद करा, संडे हो या मंडे रोज असे नो हॉर्न डे, नको हॉर्न हवी शांतता, हॉर्न वाजविता तुम्ही बधीर होतो आम्ही, हॉर्नबाजी बंद करू आरोग्याचे रक्षण करू अशी घोषवाक्ये लिहलेले फलक महावॉकथॉन रॅलीचे आकर्षण ठरले होते. तसेच रॅली मार्गावर विविध घोषणा देवून रस्ता सुरक्षा व नो हॉर्नबाबत जनजागृती करण्यात आली.

महावॉकथॉन कार्यक्रमास सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुधीर चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता राहूल अहिरे, परिवहन कार्यालय व बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी व वाहनचालक उपस्थित होते.