होमपेज › Satara › विडणीचे उत्तरेश्‍वर मंदिर भक्तगणांनी फुलले

विडणीचे उत्तरेश्‍वर मंदिर भक्तगणांनी फुलले

Published On: Feb 14 2018 2:56AM | Last Updated: Feb 13 2018 8:51PMविडणी वार्ताहर

विडणी, ता. फलटण येथील उत्तरेश्‍वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त शेकडो शिवभक्तांनी दर्शन घेतले. दरम्यान, देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. महाशिवरात्रीनिमित उत्तरेश्‍वर मंदिरात मंगळवारच्या पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत अबालवृध्द भाविकांच्या मोठया रांगा लागल्या होत्या. संपूर्ण मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिर परिसर गर्दीने फलून गेला होता. शिवगीतांनी व ओम नमो शिवायच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. मंदिरात चार दिवस धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.

यामध्ये शिवलिला पारायण, बालाजी महाराज शिससाठ व बालाजी महाराज गाडेकर यांची जुगलबंदी, सांप्रदायिक भारुड, सौ. अश्‍विनी महाराज अभंग यांचे किर्तन,  श्रींची आरती, गावठाण व पंचक्रोशीतील विविध भजनी मंडळाचा हरिनाम जागर, रुक्मिणी महाराज आळंदीकर यांचे किर्तन असे कार्यक्रम घेणयात आले होते. मंगळवारी रात्री12.5 वाजता लघुरुद्रा अभिषेक करुन बेल व पुष्पवृष्टी व होमहवन करण्यात आले. बुधवारी सकाळी शिवलिला पारायण समाप्ती व महाप्रसाद वाटप होणार आहे.