Tue, May 26, 2020 19:24होमपेज › Satara › महाराष्ट्राची लोककला तमाशा अडचणीत

महाराष्ट्राची लोककला तमाशा अडचणीत

Published On: Dec 14 2018 1:53AM | Last Updated: Dec 13 2018 8:46PM
उंडाळे: वैभव पाटील

गेली दीडशे वर्षांपासून चालत आलेली महाराष्ट्राची लोककला म्हणून ओळख असलेला तमाशा शासनाचे अनुदान न मिळाल्याने व राज्यातील दुष्काळी परिस्थिती यामुळे अडचणीत आला आहे. लोककला जिवंत ठेवण्यासाठी शासनाने तमाशाला वेळेवर अनुदान देण्याची गरज आहे. अनुदान नाही, तमाशाला मागणीही नाही त्यामुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेला तमाशा यापूर्वी जनतेत प्रचंड लोकप्रिय होता. या तमाशाच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि अंधश्रद्धा, इतकेच काय पण पारतंत्र्याच्या काळात तमाशाच्या माध्यमातून समाज जागृती होऊन स्वातंत्र्याचे स्फुल्‍लींगही चेतावले होते. पण हाच तमाशा इंटरनेट व टीव्हीच्या जमान्यात मागे पडला आहे. या तमाशाला उर्जितावस्था यावी म्हणून महाराष्ट्र  शासनाने तमाशाही कला जिवंत रहावी, यासाठी प्रत्येक वर्षाला एका तमाशा फंडाला 4 लाख रुपयांचे अनुदान सुरू केले. हे अनुदान सरकारकडून वेळेवर मिळत नसल्याने तमाशा मालकांची अर्थिक कोंडी होत असून गतवर्षी दुष्काळजन्य परिस्थिती व यावर्षीही त्यापेक्षा भयंकर दुष्काळ यामुळे तमाशाला ग्रामीण भागात मागणी नाही. 

यावर्षी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे यात्रांवर दुष्काळाचे सावट पडले असून गतवर्षीही यात्रांचा हंगाम विविध कारणांनी म्हणावा तसा झाला नाही त्यातच सांगली जिल्हयात जेष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांचे निधनाने कडेगाव, पलुस, खानापूर,  वाळवा तालुक्यातील काही भाग यांसह 200 ते 250 गावच्या यात्रा रद्द  झाल्या याचा फटका तमाशा कलावंताना बसला. झाडाखालचा तमाशा हा ग्रामीण यात्रातील बाज म्हणून ओळखला जातो. तमाशाशिवाय यात्राच होत नाही. असे असताना हा तमाशा आता वाढती महागाई दुष्काळी परिस्थिती यामुळे बाजुला पडत आहे. तमाशाचा एक खेळ किमान 25 ते 50 हजार रूपयापर्यंत केला जातो आणि ग्रामीण भागात सलग यात्रांमुळे तमाशा कलावंताना रोजगार मिळतो पण आलिकडे यात्रांमधून झाडाखालचा तमाशा कमी होऊ लागल्याने तमाशासाठी कर्ज काढून भांडवल उभे केलेल्या तमाशा मालकाला कलावंताचा आहे. त्यातच  शासनाचे दरवर्षाला झाडाखालच्या तमाशाला चार लाख रुपयाचे अनुदान मिळते हे ही अनुदान वेळेवर मिळत नाही. कधी चार लाख पैकी एखादा  रुपये देऊन  शासन तमाशाला मालकांची बोलवण करत आहे. गत तीन-चार वर्षांपासून हीच स्थिती असून तमाशाच्या अनुदानासाठी सांस्कृतीक कार्यमंत्री  विनोद तावडे यांची तमाशाकडे मालक व कलावंतानी भेट घेतली. तेंव्हा येत्या महिन्याभरात अनुदान देण्याचे आश्‍वासन दिलेपण प्रत्यक्षात तीन वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या कलावंताना येणार्‍या महिन्याची प्रतिक्षा लागून राहिली आहे. 

तमाशाचा इतिहास

तमाशाचा जन्म  1860 साली झाला पूर्वी तमाशाला तमाशा हे नाव नव्हते तर गम्मत म्हणून त्याची ओळख  झाली. मोहनी बटावू हा पहिला तमाशाअस्तित्वातआला आणितेथून पुढे  गम्मत  ऐवजी लोकनाटय  तमाशा हे नाव समाजरुढ झाले. आजही ते नाव पुढे चालत आले. मोहणी बटावू नंतर दाजी इंदुलकर, विठ्ठल मांग यांसह तमाशे तयार झाले आज सातारा जिल्हयात जवळपास 60 ते 70 तमाशा फड आहेत. या माध्यमातून लोकला जिवंत ठेवण्याबरोबर रोजगारही उपलब्ध होतआहे. 

अनुदान नसल्याने आणि यात्रांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने यात्रा काळात 200 ते 250 प्रयोग करणार्‍या तमाशा मालकांना 50 ते 60 खेळांवर समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे शासनाने त्वरीत अनुदान द्यावे. -सुदाम साठे म्हासोलीकर तमाशा मालक