होमपेज › Satara › सोनियांच्या "डिनर डिप्लोमासी'ला महसूल मंत्र्यांकडून आव्हान(व्हिडिओ)

सोनियांच्या "डिनर डिप्लोमासी'ला आव्हान(व्हिडिओ)

Published On: Mar 18 2018 12:49PM | Last Updated: Mar 18 2018 4:42PMकराड (जि. सातारा) : प्रतिनिधी 

आगामी २०१९ च्या निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी दिल्लीत सोनिया गांधीच्या उपस्थितीत "डिनर डिप्लोमासी' झाली. त्‍यामुळे राज्यातही अनेकांना आशा निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्र्यांच्या लोकसभा मतदारसंघातील पराभव झाल्याचे सांगत "अरे त्याचे विश्लेषण तर करा? ' असे आव्हान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यंनी विरोधी पक्षांना दिले आहे. 

रेठरे बुद्रूक (ता. कराड) येथील नवनिर्वाचित भाजप ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांच्या सत्कार समारंभात पाटील बोलत होते. ते म्‍हणाले, ‘‘मायावती, मुलायमसिंह यादव यांचे चिरंजीव यांचा पक्ष असे दोन बलाढ्य पक्ष 23 वर्षांनी एकत्र आले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्‍यनाथ 25 वर्ष त्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यामुळे थोडे गाफील राहिले असतील. केवळ 37 टक्केच मतदान होऊनही 21 हजारांनी भाजप उमेदवाराचा पराभव झाला आहे. दोन चार टक्के अधिक मतदान झाले असते तर दोन्ही बलाढ्य पक्ष एकत्र येऊनही आम्ही त्यांचा पराभव केला असता, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

भाजपाचे सरकार २०१९ मध्ये सत्‍तेवर आले तर काय होईल? हे परत मागे फिरणार नाहीत. या भीतीने देशासह राज्यात विरोधक एकत्र येत आहेत. मात्र, आम्ही विरोधक एकत्र येण्याचीच वाट पाहात आहोत. ते एकत्र आल्यास आम्ही अधिक जिद्दीने उभे राहू, असे सांगत देशातील व राज्यातील विरोधी पक्षांना चंद्रकांत पाटील यांनी खुले आव्हान दिले आहे.


Tags : Maharashtra Minister, Chandrakant Patil,  opposition party, satara district, karad taluk