होमपेज › Satara › नगराध्यक्षांसह नगरसेवकांची दुचाकीवरून रपेट

नगराध्यक्षांसह नगरसेवकांची दुचाकीवरून रपेट

Published On: Feb 09 2018 2:02AM | Last Updated: Feb 08 2018 9:50PMमहाबळेश्‍वर : वार्ताहर

केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण’ साठी महाबळेश्‍वर पालिका सज्ज झाली आहे. दरम्यान, शहर व परिसरातील स्वच्छता मोहिमेची पाहणी करण्यासाठी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, उपनगराध्यक्ष अफझल सुतार यांच्यासह मुख्याधिकारी यांनी दुचाकीवरून विविध प्रभागात रपेट मारली. यावेळी नगरसेवकही सहभागी झाले होते. 

स्वच्छ सर्वेक्षणसाठी महाबळेश्‍वर पालिकेने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. त्याला शहरातील सामाजिक संस्था, संघटना, बचत गटांची साथ मिळू लागली असून नागरिकांचाही सहभाग वाढू लागला आहे.  गेल्या काही महिन्यांमध्ये नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, उपनगराध्यक्ष अफझल सुतार, पालिकेचे नगरसवेक व मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांच्यासह सर्वच विभागातील कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले आहे.  

दरमयान, बस स्थानक परिसर, पार्किंग, मुख्य बाजारपेठ, स्वच्छतागृहे, सार्वजनिक ठिकाणे, पर्यटकांचे आकर्षण असलेला वेण्णालेक सह शहर व परिसरातील प्रभागांसह सर्व मोहल्ले, रांजणवाडी गादळवाडी, लिंगमाळा, कारवीआळा, ग्रामीण रुग्णालय असा परिसराची नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, उपनगराध्यक्ष अफझल सुतार, नगरसवेक कुमार शिंदे, युसूफ शेख, मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील, नगरसेविका स्नेहल जंगम, सुनीता आखाडे, अफ्रिन वारुणकर, जुबेदा मुलाणी पाहणी करताना दिसत आहेत. अधिकार्‍यांसह सर्वच कर्मचारी ”स्वच्छ व सुंदर महाबळेश्‍वर”साठी झटून कामाला लागल्याचे चित्र असून शहरवासीयदेखील मोहिमेस सहकार्य करत आहेत.