Wed, May 27, 2020 08:53होमपेज › Satara › पवार असते तरी पराभवच झाला असता : पाटील 

पवार असते तरी पराभवच झाला असता : पाटील 

Published On: May 25 2019 2:10AM | Last Updated: May 24 2019 11:40PM
फलटण : प्रतिनिधी

माढा लोकसभा निवडणुकीत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी इतिहासात नोंद होईल असा विजय मिळवला आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार जरी उभे असते तरीही त्यांचा पराभव रणजितसिंह यांनी केला असता. रणजितसिंह यांचा विजय अभूतपूर्व आहे, असे मत महसूलमंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केले.

सोलापूरमध्ये रणजितसिंहांनी भेटी -गाठी घेतल्याने ते निकालानंतर फलटणमध्ये आले नव्हते. मात्र, शुक्रवारी सायंकाळी ते फलटणमध्ये आले असता त्यांची फलटण शहरातून अपूर्व उत्साहात जंगी मिरवणूक काढण्यात आली. फलटणमध्ये ते आल्यानंतर त्यांचे स्वागत क्रांतिसिंह  नाना पाटील चौकात करण्यात आले. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात जेसीबीमधून गुलाल उधळत उघड्या जीपमधून खा. रणजितसिंहांची थाटात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी अवघी फलटणनगरी सजली होती. यावेळी नागरिक व  युवक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते यानंतर आयोजित जाहीर सभेत ना. पाटील बोलत होते. या वेळी माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, उत्तमराव जानकर, मा. आ. दिलीपराव येळगावकर, अनिल देसाई मनोज घोरपडे उपस्थित होते. 

ना. पाटील म्हणाले की स्व.पंडित नेहरू यांच्या नंतर सर्वात मोठा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिळवला आहे. आपला माणूस खासदार झाला याचा आनंद तुमच्या चेहर्‍यावर दिसत असून तुम्ही सर्वांनी गेली महिनाभर आपण केलेलं कष्ट फळाला आले.  शरद पवार जरी उभे असते तरीही ते पडले असते.  आमचं ठरलंय याची आठवण करून देत कोल्हापूर पॅटर्न आपण राबविण्यात तुम्ही यशस्वी झाला असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले.

यावेळी आ. नारायण पाटील, समशेरसिंह नाईक निंबाळकर, दिगंबर आगवणे, अनुप शहा, अ‍ॅड. नरसिंह निकम, सुशांत निंबाळकर, जयकुमार शिंदे, विश्वासराव भोसले, बाळासाहेब कदम, अशोकराव जाधव, काका खराडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.