Wed, Mar 20, 2019 03:09होमपेज › Satara › सातारा : माथेफिरू मुलाकडून वडिलांचा निर्घृण खून

सातारा : माथेफिरू मुलाकडून वडिलांचा निर्घृण खून

Published On: Jun 09 2018 5:49PM | Last Updated: Jun 09 2018 5:49PMऔंध : वर्ताहर

वांझोळी ता.खटाव येथे माथेफीरू मुलाने वडीलांचा कोयत्याने वार करून निर्घूण खून केल्याची घटना घडली आहे. यामुळे खटाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, वांझोळी येथील दिनकर गंगाराम मगर वय 87 अनेक वर्षांपासून गावात शेती करत आहेत. त्यांचा मुलगा रमेश मगर वय 51 हा लहानपणापासून डोक्यावर परिणाम झाल्यासारखा वागत आहे.

काही दिवसांपासून गावात फिरून लोकांना त्रास देत असल्याने त्यांच्या घरचे लोक वैतागले होते. त्यामुळे काही दिवसांपासून कुटुंबियांनी त्याला शेतातील जगताप मळयात बंद करून ठेवले होते. शनिवारी सकाळी वैतागून त्याने शेतातील घराचे दार तोडून बाहेर आला. घरच्यांना काही कळायच्या आत घराजवळील गोठयात ठेवलेला कोयता घेऊन चिडून जाऊन वडिलांवर त्याने वार करून खून केला.
दरम्यान वांझोळी गावात अचानक घडलेल्या या प्रकरणामुळे गाव हादरून गेले आहे. खून केल्यानंतर रमेश हा औंध पोलिस ठाण्यात हजर झाला.