Sat, Feb 23, 2019 10:56होमपेज › Satara › सांगली पोलिसांवर हल्ला; साताऱ्याचा गुन्हेगार पळाला

सांगली पोलिसांवर हल्ला; साताऱ्याचा गुन्हेगार पळाला

Published On: Apr 25 2018 2:16PM | Last Updated: Apr 25 2018 2:15PMसातारा : प्रतिनिधी

मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेला साताऱ्यातील दत्ता जाधव आणि त्याच्या साथीदारांनी सांगली पोलिसांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना काल (मंगळवार दि. २४ एप्रिल) रात्री घडली असून याबाबतची नोंद जत पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 

 याबाबत प्राथमिक माहिती अशी सातारा येथील दत्ता जाधव व त्याच्या टोळीवर नुकतीच मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मोक्काची कारवाई होताच तो साताऱ्यातून पसार झाला होता. त्यानांतर सांगली येथील जतच्या पोलिसांना त्याच्याबाबत माहिती मिळाली.  मंगळवारी जत पोलिस त्याला पकडण्यासाठी गेल्यानंतर दत्ता जाधव व त्याच्या टोळीने पोलिसांवर तुफान दगडफेक केली. या हल्ल्यात पोलीस व्हॅनचीही तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर दत्ता जाधव नाट्यमयरित्या पसार झाला. 

दरम्यान, मोक्काअंतर्गत कारवाई झालेले अनेकजण मोकाट आहेत. त्यांच्याकडून पोलिस लक्ष्य झाल्याने सातारा पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

Tags : Accused, MOCCA, Sangli, Police, Attack