Mon, Jun 17, 2019 04:19होमपेज › Satara › मनसेच्या ७१ पदाधिकार्‍यांचा सामूहिक राजीनामा

मनसेच्या ७१ पदाधिकार्‍यांचा सामूहिक राजीनामा

Published On: Mar 07 2018 11:27PM | Last Updated: Mar 07 2018 11:00PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यामध्ये मनसेच्या पडत्या काळामध्ये संदीप मोझर यांनी राज्य उपाध्यक्षपद घेवून मनसेला उभारी आणली. त्यांच्या माध्यमातून अनेक आंदोलने उभारून हजारो नागरिकांना न्याय मिळाला. त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ येत असेल तर ही बाब गंभीर आहे. याबाबत वरिष्ठांकडून कोणत्याच प्रतिक्रिया न आल्याने जिल्ह्यातील मनसेच्या 71 पदाधिकार्‍यांनी बुधवारी सामुहिक राजीनामा दिला. 

मनसेच्या या पदाधिकार्‍यांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठवलेल्या राजीनामापत्रात म्हटले आहे की, संदीप मोझर यांनी जिल्ह्यात पक्ष उभा करण्यासाठी खूप कष्ट घेतले. त्यांच्यामुळेच जिल्ह्यात मनसेचा प्रभाव वाढला आहे. मात्र, त्यांच्यासारख्या नेत्यांवर राजीनामा देण्याची वेळ येत असेल तर ही बाब पश्‍चिम महाराष्ट्र व जिल्ह्यासाठी घातक आहे.

मोझर यांनी स्वत: सर्व पदाधिकार्‍यांना पक्षातच राहण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी त्यांनी निर्णय  जाहीर करून दोन दिवस उलटले तरी पक्षातील जबाबदार व वरिष्ठ नेत्यांकडून याबाबत काहीच प्रतिक्रिया व्यक्‍त होत नाही व विचारणाही केली जात नाही. हा प्रकार आमच्यासाठी अपमानास्पद आहे. त्यामुळे आमचा स्वाभिमान अखंडीत रहावा व मोझर यांची वैचारिक पाठराखण करावी यासाठी हा राजीनामा देत असल्याचे  म्हटले आहे.